धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात?
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा 4 मार्च रोजी दिला. त्यांच्यावर बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे चर्चित असलेले धनंजय मुंडे यांनी सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांच्यासह सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला राजीनामा दिला. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केल्याचे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना कार्यमुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली.
राजीनामा दिल्यानन्तर आता मुंडे यांची आमदारकी राहणार का? हा प्रश्न उद्भवत आहे. आता राजीनामा दिल्यावर धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार का हे पाहावे लागणार आहे. मात्र अद्याप तरी धनंजय मुंडे यांच्या आमदारकीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या तरी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा चार्जशीट मध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.आता पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.