डॉल्फिनचा मृतदेह वाहून आला, वर्षातील ९ वी घटना
मुंबईतील गिरगाव चौपाटीवरदेखील आठ फुटांच्या डॉल्फिनचा मृतदेह वाहून आला आहे. गेल्या वर्षभरात मृतावस्थेत डॉल्फिन वाहून येण्याची ही नववी घटना आहे. वर्दळ असलेल्या किनाऱ्यावर हंम्पबॅग डॉल्फिन मृतावस्थेत आढाळला. डॉल्फिनचा मृत्यू कदाचित ७२ तासांपूर्वी झाला असावा त्यानंतर तो मृतावस्थेत किनाऱ्याजवळ वाहून आल्याची शक्यता वन विभागानं वर्तवली आहे.
समुद्रातील प्रदूषण व जलवाहतुकीमुळे समुद्रात वाढलेली जहाजे यामुळे समुद्री जीवांना धोका पोहोचत आहेत. त्यातून २०१६ पासून किनाऱ्यावर महाकाय माशांचे मृतदेह वाहून येण्याचं प्रमाणं वाढलं आहे. या समस्येवर ठोस उपाय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच संरक्षित जातीच्या माशांची सुरक्षा कशी करता येईल याचीही पाहणी संबंधित विभागांनी करण्याची मागणीही येऊ लागली आहे.