भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंधित डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक अवैध - न्यायालय
कोरेगाव हिंसाचार, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणेपोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली होती. त्यांना पुण्यातील सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आता मात्र ही अटक अवैध असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटल असून त्यामुळे न्यायालयाच्या या मोठ्या महत्वपूर्ण निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न निर्माण झाले आहे. मुंबई येथील विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक केली होती. तर पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला नेले होते. न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी केली. विशेष न्यायालयाने ही अटक अवैध असल्याचं म्हटल आहे. पुणे पोलिसांना हा मोठा धक्का असून लवकरच तेलतुंबडेंची सुटका होणार आहे. पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा तेलतुंबडे यांनी केला होता. तर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सोबतच त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी देखील केली होती. त्यामुळे यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला होता. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना 4 आठवड्यांचे संरक्षण दिले असताना, ही अटक म्हणजे न्यायालाचा अवमान आहे, असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सोबतच न्यायालयाने दिलेले संरक्षण 11 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे असे न्यायलयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरेगाव आणि नक्षलवादी प्रकरण यावर केलेले पोलिसांनी तपास यावर प्रश्न निर्माण केले आहेत.