बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (18:22 IST)

फडणवीसांच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी प्रभाग रचना बदलली

shinde
तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पराभव होण्याची भीती भाजपला असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर यांनी प्रभाग रचना बदलली, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.
 
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग रचनेचा विषय मंत्रिमंडळात आला. तेव्हा आपण तीन सदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला. पण, त्यावेळी शिंदे यांनी तीन सदस्यीय प्रभाग रचनेला सहमती दर्शवली होती.