सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (13:28 IST)

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, पुराचे संकट

Due to torrential rains in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यात पावसाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे.जळगावच्या भडगाव,पाचोरा आणि चाळीसगावामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून,रस्ते,घरं,दुकानं पाण्याखाली गेली आहे. रस्त्यावरील  वाहने पाण्याखाली बुडाले आहे.चाळीसगाव अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.सध्या जळगाव जिल्ह्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. 

चाळीसगाव मध्ये पुराचे पाणी गिरणा न तितूर नदीत मिळाल्याने जवळच्या गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पाऊस असल्यामुळे इथे वीजपुरवठा खंडित झाला आहे.अनेक गावांशी सम्पर्क तुटला आहे.प्रशासनाकडून उपाययोजनेला सुरुवात झाली आहे.चाळीसगावाततील कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.चाळीसगावात धरण पूर्णपणे तुडुंब भरले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.त्यामुळे त्या काठावरील गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने पुढील 3 -4 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे औरंगाबाद मध्ये दरड कोसळली असून औरंगाबादातील पाझर तलाव फुटला आहे.