शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (07:50 IST)

रामगडावर पार पडला दुर्गवीरांचा विजयदुर्गोत्सव

ramgarh
तोरण गडाला मग माझ्या घराला’ या संकल्पनेतून दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड किल्यावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विजयदुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गडावर गडपुजन, गणेश पूजन, तसेच शस्त्रपूजन करण्यात आले.
 
दुर्गवीरांनी सकाळी लवकर येऊन गडावर पूर्व तयारीला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली, तसेच दुर्गवीरांसोबत गडावरील पूर्वतयारीस सहकार्य केले.  यावेळी फुलांचा माळा, पारंपरिक नव्याची तोरणं, पताका यांच्या साहाय्याने गडाची प्रवेशद्वारं  सजविण्यात आली.  गडांच्या दोन्ही द्वारांवर गडपूजन करून पुढे ग्रामस्थांच्या हस्ते गडावर असलेल्या प्राचीन गणेश मूर्तीचे ,तुळशी वृंदावनाचे तसेच महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आरती आणि गारद देऊन पुढील कार्यक्रम अर्थात शस्त्र पूजन करण्यासाठी सर्वजण गडावर असलेल्या तोफांजवळ पोचले. वर्षभर गडकिल्ल्यांच्या सेवेसाठी तयार असणा-या तसेच ज्याच्यामुळे गडसंवर्धनाचे काम दुर्गवीर करू शकतात त्या अवजारे आणि हत्यारांचे विजयादशमी निमित्त पूजन व औक्षण करण्यात आले. शेवटी प्रसाद वाटप करून महाराजांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Edited by : Ratnadeep Ranshoor