शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2017 (08:40 IST)

पिकनिकचा सेल्फी जीवावर बेतला नाव उलटून 10 बुडाले

सेल्फिचा मोह नेहमी घात करतोय का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिक काळ वेळ न पाहता सेल्फी घेतात. असा एक सेल्फिने 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  नावेत फिरत असलेल्या  तरुणांनी जलाशयाच्या मधोमध जाऊन डोंग्यात अर्थात नावेत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. एकाच भागात जास्त भार झाल्यामुळे नाव  असंतुलीत होऊन उलटला. परिणामी १० जणांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त आहे. रविवारी सायंकाळी अमरावती महामार्गानजिक  रात्री ९.३० पर्यंत जलाशयातून तीन मृतदेह बाहेर काढले. दरम्यान,प्रचंड असेल्या  अंधारामुळे बचावकार्यात मोठा अडसर निर्माण झाला होता.  यातील नाव चालक आणि एक प्रवासी बचावले आहेत. या दोघांना पोहता येत असल्याने ते वाचले आहेत. अजूनही बचाव कार्य सुरु आहे.