गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (13:21 IST)

इंडिगो विमानाच्या इंजिनमधून आगीची ठिणगी, इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली- दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनला आग लागल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. विमान दिल्लीहून बंगळुरूला जात होते. दरम्यान, विमानाच्या इंजिनमध्ये स्पार्क झाल्याने दिल्लीच्या IGI विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमान टेक ऑफ करत असतानाच ही घटना उघडकीस आली. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
वृत्तानुसार, इंडिगो विमानाच्या इंजिनमधून स्पार्क निघाल्यानंतर पायलटने विमान टेक ऑफ करण्यापासून थांबवले. विमानातील सर्व 180 प्रवासी सुरक्षित आहेत. यावेळी विमानतळावर अग्निशमन दल, पोलीस, सीआयएसएफ हे सर्व पूर्णपणे सतर्क होते.
 
याच्या एक दिवस आधी आकासा एअरच्या विमानाला अपघात झाला होता. अहमदाबादहून दिल्लीला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानाला गुरुवारी हा पक्षी धडकला. मात्र, असे असतानाही विमान दिल्लीत सुखरूप उतरले.