भाजी घेतलीत तरी भाजपा ईडीला सांगेल”संजय राऊतांचा ईडीवरून भाजपाला टोला
“पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपाचं (BJP)लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवं”असे नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी ईडीवरून (ED)भाजपावर हल्ला चढवला.
भाजपच्या (BJP)खासदार आणि आमदारांनाही भोजनाचं आमंत्रण दिलं का? असा सवाल केला असता आमंत्रण सर्व पक्षांना दिलं आहे. आमच्यात फाळणी होत नाही. आम्ही राजकीय जातीय धार्मिक फाळणीच्या विरोधातील आहोत. अखंड महाराष्ट्रातील जे जे खासदार दिल्लीत (delhi)उपस्थित आहेत. त्यांना बोलावलं आहे. यात राजकीय पक्ष पाहण्याची आवड कुणाला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.
सोमवारी शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्याबाबतची माहिती राऊतांनी दिली. काही खासदारांनी काही भूमिका मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Chief Minister Uddhav Thackeray)सूचनेने शिवसंवादाच्या निमित्ताने खासदार विदर्भात गेले होते. त्यांनी अहवाल तयार केला आहे. संसदेचं अधिवशेन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सर्व खासदारांची बैठक होईल. या दौऱ्यात जो अनुभव आला त्यावर आणि संघटनात्मक त्रुटीवर चर्चा केली जाईल. खासदारांच्या काही तक्रारी आहेत असं तुम्ही म्हणता त्यात तथ्य नाही. काही ठिकाणी मजबुतीने काम करावं लागेल हे मात्र खरं आहे.