मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (10:05 IST)

चित्तथरारक ! बिबट्याचं डोकं फोडून स्वतःची सुटका करणारी धाडसी तरुणी

Exciting! A brave young woman who breaks a leopard's head and frees herself Maharashtra News Regional Marathi News बिबट्याचं डोकं फोडून स्वतःची सुटका करणारी धाडसी तरुणी News In Marathi Webdunia Marathi
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे एक चित्तथरारक घटना घडली येथील एका तरुणीमध्ये एका बिबट्याने हल्ला केला. अशा परिस्थितीत तरुणीने न घाबरता त्या बिबट्याच्या डोक्यावर कळशीने हल्ला करून स्वतःची सुटका करून प्राण वाचवले. या हल्ल्यात तरुणीच्या अंगावर जखमा आल्या आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. 
 
ही घटना घडली आहे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील करंजखेड शिवारातली वृषाली नीळकंठराव ठाकरे ही मुलगी सोमवारी आपल्या आईसह शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. काम करताना ती पिण्यासाठी पाणी आणायला गेली असता पाठीमागून अचानक एका बिबट्याने तिचावर हल्ला केला. काही समजायच्या आत तिची मानच बिबट्याच्या जबड्यात गेली. तिने न घाबरता प्रसंगावधानाने हातातील कळशीने बिबट्याच्या डोक्यावर एकापाठोपाठ वार करायला सुरुवात केली. आपल्यावर झालेल्या हल्ला बघून बिबट्याने वृषालीची मान सोडली आणि घाबरून पळ काढली. आणि जंगलाच्या दिशेने पसार झाला. 
 
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृषाली जखमी झाली असून  तिचा वर रुग्णालयात उपचार सुरु आहे. वृषाली सध्या फार्मसीचं शिक्षण घेत आहे. आर्थिक स्थिती बेताची असून आपल्या आईला शेतीच्या कामात मदत करते. तिने प्रसंगावधानाने आपली सुटका बिबट्याच्या तावडीतून करून आपले प्राण वाचवले त्यासाठी तिच्या धाडसीचे सर्वत्र कौतुक होत आहे.