विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
पक्षा विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे(Vijay Shivtare) यांची शिवसेनेतून हाकाळ पट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात आणि पक्षाची शिस्त मोडल्यावर त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे सामना या वृत्तपत्रातून म्हटले आहे. शिवसेनेतून मागील काही दिवसांपासून सतत शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांच्या हाकाळपट्ट्या करण्याचे सत्र सुरु आहे. पक्षांविरोधात कारवाया करणाऱ्यांवर उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. विजय शिवतारे यांची आता शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली असून विजय शिवतारे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले असून त्यांचे शिवसेनेचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. विजय हे शिवसेनेचे माजी आमदार असून पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते.