गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:50 IST)

फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Fadnavis called on Union Home Minister Amit Shah Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत आहेत.या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक चर्चा त्यामुळे अमित शाह आणि फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
 
अमित शाह यांच्या संसदेतल्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. राज्यातले अनेक प्रमुख भाजपा नेते दिल्लीतच आहेत.मात्र,फडणवीस यांनी एकट्याने अमित शाहांची भेट घेतल्याने या चर्चा जोर धरत आहेत. एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच असावे,अशा प्रकारची मागणी आपण केली आहे. आज त्यासंदर्भातील विधेयक संसदेत येते आहे. हे विधेयक लवकरात लवकर एकमताने मंजूर व्हावे,अशी मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. तर रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.