शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:36 IST)

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरीची बंपर भरती

Job bumper recruitment in Maharashtra Government Health Department Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नोकरीची बंपर भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत आरोग्य विभागाच्या एकूण 3 हजार 466 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.यामध्ये ड गटासाठीच्या नोकरभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रक्रियेत पात्र असलेल्या उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीन अर्ज दाखल करावा लागणार आहे. तसेच येत्या 9 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात होणार आहे. या संबधीत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या भरतीच्या जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.तसेच उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
 
आरोग्य विभागात भरती प्रक्रियेमधून महाराष्ट्रातली अहमदनगर,धुळे,नाशिक,रायगड,पालघर,ठाणे,जळगाव, परभणी,जालना,सांगली,रत्नागिरी,कोल्हापूर,सोलापूर,सातारा पुणे,नंदुरबार,बुलडाणा,नांदेड,बीड,अकोला, उस्मानाबाद,लातूर,औरंगाबाद,हिंगोली,पुणे,चंद्रपूर,गोंदिया,वर्धा,गडचिरोली,भंडारा,नागपूर, वतमाळ,वाशीम आदी जिल्ह्यांमधील ड प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत.
 
भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.  9 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही 22 ऑगस्ट 2021 ही आहे.वेबसाइट-arogya.maharashtra.gov.in