शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2017 (15:17 IST)

प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांचे निधन

प्रसिद्ध मूर्तिकार आणि त्यातही  गणेश मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल आहे. त्यांचे वय  63 होते. मुंबई येथील  दादरमधील  घरी अखेरचा श्वास घेतला आहे.  खातू यांनी जगप्रसिद्ध अश्या  गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. मुंबईत परेल वर्कशॉपजवळखातू यांचा  गणेश मूर्तींचा कारखाना आहे. या ठिकाणी गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात सुरु आहे.

 चिराबाझार, गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, वसईचा, चंदनवाडी, खेतवाडी, तुलसीवाडी, महाराजा यासारख्या गणेशमूर्ती खातू तयार करायचे. गेल्या 40 वर्षांत त्यांनी 250 पेक्षा जास्त 25 फुटांहून जास्त उंचीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यांच्या अश्या जाण्याने अनेक मंडळ आणि नागरिकांना धक्का बसला आहे.