आजाराला कंटाळून युवकाने पित्यासमोरच केली आत्महत्या
आजाराला कंटाळून अक्सानगरातील तरुणाने मामा, पित्याच्या डोळ्यांदेखत विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना मेहरूण येथील शिवाजी उद्यानात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इमरान अकिख खान असे मृत युवकाचे नाव आहे.
इमरान हा जळगावातील अक्सा नगर येथे राहतो. एमआयडीसीतील कपाट बनविण्याच्या दुकानात तो कामाला आहे. गेल्या पाच ते महिन्यांपासून त्याला डोके दुखी आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तो तणावग्रस्त होता. डोकं दुखत होते. म्हणून दुपारी ३.३० वाजता मेहरूण मधील छत्रपती शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, उद्यानात असलेल्या वापर नसलेल्या विहिरीजवळ तो फीरत होता. मामा आसिफ शेख आणि वडील अकील खान यांच्या डोळ्यांदेखत अचानक त्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. दोन महिन्यापुर्वीच इमरानचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई ,वडील, बहिण, पत्नी असा परिवार आहे.
इमरान खान याने ३.४५ वाजता विहिरीत उडी घेतली त्यानंतर महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी शोधमोहिम सुरू केली. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर मयत इमरानचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.