मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (09:00 IST)

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

Shocking! A 5-year-old girl who went to watch TV was raped by a young man
मुंबईमधील जोगेश्वरी येथे एका तरुणाने अवघ्या 5 वर्षाच्या मुलीला आपल्या विकृतीचं शिकार बनवल्याचं समोर आलं आहे. जोगेश्वरी येथील बेहराम परिसरातील ही घटना आहे. संबंधित मुलीचे कुटुंब आरोपीच्या घरातील वरच्या मजल्यावर भाड्याने राहतात. 5 वर्षाची मुलगी रोज त्यांच्या घरी टिव्ही पाहायला जायची. घर मालकाचा मुलगा अर्थात आरोपी हा मेडिकलचे शिक्षण घेतो. संबंधित आरोपीचं नाव सुनिल सुखाराम गुप्ता असं आहे.
 
संबंधित मुलगी आपल्या घर मालकाच्या घरी रोजप्रमाणे टिव्ही पाहायला गेली. यादरम्यान, घरी फक्त आरोपी सुनिल होता. लहान मुलीच्या भोळेपणाचा फायदा घेत सुनिलने ती घरी आल्यानंतर काही वेळाने घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर सुनिलने 5 वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार केला. थोड्या वेळाने मुलगी रडत घरी गेल्यावर आईने विचारणा केली. यावेळी मुलीने संपुर्ण प्रकार सांगितला.
 
दरम्यान, संबंधित 5 वर्षाच्या मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी सुनिलला अटक देखील केली आहे.