गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (16:09 IST)

संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करा-सचीन खरात

संभाजी भिडे यांनी भारत देशाबद्दल अत्यंत चुकिचे विधान केले आहे. या विधानाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष निषेध करत असून सचीन खरात म्हणाले भाजपा पक्ष प्रत्येक वेळेस बोलतो,प्रतिक्रीया देत असतात. प्रथम देश नंतर पक्ष मग आता संभाजी भिडे यांनी भारत देशाविषयी जे वक्तव्य केलं आहे यावर मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस हे का गप्प आहेत यांनी भूमिका जाहीर करावी तसेच कन्हैया कुमार यांना टुकडे टुकडे गँग म्हणत असतात मग आता संभाजी भिडे यांना कोणती गँग म्हणणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सचीन खरात महाविकासआघाडी सरकारला करत आहेत.
 
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडेंनी सांगलीत बोलताना म्हटले आहे की, आपला देश जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश, मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. आपण तो क्रमांक एक मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत आपल्याला जमले नाही त्या गोष्टीत चीन पुढे आहे, जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी आहे, पण हिंदूना मेंदू असतो.