बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (07:40 IST)

एका ओढ्यात बुडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या कोळवण गावाजवळ एका ओढ्यात बुडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींमध्ये आईवडील आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे पाचही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत अशी माहिती पौड पोलिसांनी दिली.
 
शंकर दशरथ लायगुडे (वय 38) पौर्णिमा शंकर लायगुडे (वय 36) अर्पिता शंकर लायगुडे (वय 20) राजश्री शंकर लायगुडे, आणि अंकिता शंकर लायगुडे अशी मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची नावे आहेत. हे सर्वजण मुळशी तालुक्यातील वाळीन गावचे रहिवासी होते.
 
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोर्णिमा लायगुडे या मुलींसह कपडे धुण्यासाठी ओढ्याच्या काठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या ओढ्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी तिन्ही मुली ओढ्यात गेल्या मात्र त्या तिघीही पाण्यात बुडाल्या. दरम्यान पत्नी आणि मुली उडण्याची माहिती शंकर लायगुडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ही ओढ्यात उतरून पत्नी आणि मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते देखील पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढले. पौड पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे.