गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (16:53 IST)

विखे पाटील यांच्यासह दोन मंत्र्यांना न्झयायालयाचा झटका

मुंबई उच्च न्यायालयाने नवीन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दोन मंत्र्यांना झटका दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेल्या शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर आणि आरपीआयच्या अविनाश महातेकर यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना एक महिन्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. विखे पाटील, क्षीरसागर आणि महातेकर यांच्या मंत्रिपदाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. 
 
नवनिर्वाचित मंत्र्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करून दिल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आक्षेप नोंदवला. कोणत्याही सभागृहाचे सदस्यत्व नसताना मंत्रिपदाची शपथविधी करता येत नाही, असे ते म्हणाले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा हा मुद्दा गैरलागू असल्याचे म्हटले होते.