शुक्रवार, 1 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (09:36 IST)

मोफत शिवभोजन थाळी बंद, प्रति प्लेट किती रुपये द्यावे लागणार?

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे आणि कामगारांचे हाल सुरू झाले होते. अशा गरजूंसाठी राज्य सरकारने मोफत शिवभोजन थाळी सुरू केली होती.
 
कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर शासनाने निर्बंध हळूहळू कमी केले आहेत. त्यानंतर आता शासनाने शिवभोजन थाळी मोफत देणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्णयानुसार गरीब आणि गरजूंना शिवभोजन केंद्रांवर 30 सप्टेंबरनंतर मोफत शिवभोजन थाळी मिळू शकणार नाही.
 
शासनाच्या निर्णयानुसार, आता 1 ऑक्टोबरपासून ग्राहकांना शिवभोजन थाळीसाठी पूर्वीप्रमाणे प्रति प्लेट 10 रुपये द्यावे लागणार आहेत. मंगळवारी (29 सप्टेंबर) राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.
 
या परिपत्रकानुसार शिवभोजन थाळीची पार्सल सुविधा देखील शिवभोजन केंद्रांवर उपलब्ध होणार नाही.