बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (09:31 IST)

पाण्यापासूनही विमान आणि रेल्वे चालवणार, गडकरी यांचा फॉर्म्युला

nitin
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी आपल्या अनोख्या कल्पना मांडत असतात. अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक नवीन प्रयोग जनतेसमोर मांडला.
 
येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याचे ते म्हणाले.
 
"मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो", असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.