मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (16:38 IST)

गोदावरीच्या पुरातून वयस्कर पुजाऱ्याला 26 तासानंतर वाचवले

Godavari survivor rescues an elderly priest after 26 hours
सिन्नर येथील जोगलटेंभी येथील गोदावरी-दारणा नदीच्या संगमावर पुराच्या वेढ्यात अडकलेले पुजारी महंत मोहनदास महाराज वय ६२ त्यांना अन्य पाण्याची व्यवस्था करण्यास गेलेल्या जीवनरक्षक गोविंद तुपे (वय ४५) यांना सोमवारी (दि. ५) दुपारी १२ च्या सुमारास एनडीआएफच्या टीमने तब्बल २६ तासानंतर सुरक्षित बाहेर काढले आहे.
 
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावर
रविवारी सकाळी महादेव मंदिराला पाण्याचा वेढा पडला तेव्हा ग्रामस्थांनी पुजार्‍याला बाहेर येण्याची विनंती केली. मात्र पुजारी काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता त्याने याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर पूर्ण मंदिर पाण्याच्या विळख्यात सापडले. त्यात महंत मोहनदास अडकून पडले होते. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तहसीलदार राहुल कोताडे, पोलिस निरीक्षक अशोक रहाटे आदींसह अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी गेले मात्र, अंधार पडल्याने बचावकार्य पूर्ण होऊ शकले नाही. मात्र सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षाचे जीवरक्षक जोगलटेंभीत दाखल झाले. त्यांनी तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवत पुजार्‍यासह जीवनरक्षकाला पुराच्या वेढ्यातून सुरक्षित अखेर बाहेर काढले आहे.