गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (23:18 IST)

Gondiya :गोंदियात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीची मृत्यूशी झुंज

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गोंदिया येथे घडली आहे. या मुलीवर अत्याचार केल्याने ती चार महिन्यांनी गर्भवती राहिली आणि त्यावर आरोपीने मुलीला कोणत्याही चिकित्सकी परामर्श शिवाय गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्याने आता मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियात अल्पवयीनवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुलं पीडित मुलगी गर्भवती झाली. आरोपीनं डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पीडित मुलीला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्ती खायला दिल्या. त्यानंतर पीडित मुलीची प्रकृती खालावली असून गोंदियातील रुग्णालयात पीडिता मृत्यूशी झूंज देत आहे.
 
ही घटना उघडकीस आल्यावर शिवसेनेच्या आमदार मनीषा कांदे यांनी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस करत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या पीडित अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.आणि ती मृत्यूशी झुंज देत आहे.