शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:04 IST)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लस घेतली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून दुसऱ्या टप्प्यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लस घेतल्याचे समोर आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोव्हॅक्सीन ही कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.