1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (16:31 IST)

पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत

निवारा केंद्रात असलेले पूरग्रस्त लोक आता परत आपापल्या घरी परतत आहेत. शासनाच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटपही सुरू केले आहे. तसेच पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे निवारा केंद्रांची संख्या कमी होऊ लागली आहे. रविवार अखेर पूरग्रस्तांना १९ कोटी ७८ लाख २० हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. पूरग्रस्त ४७४ गावांतील ९४ हजार २७४ एवढी पूरग्रस्त कुटुंबांची संख्या आहे.
 
रविवार अखेर ४१ हजार ४९५ कुटुंबांना गहू व तांदूळ प्रत्येकी दहा किलो याप्रमाणे ८२९.९० मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. धान्य वाटपाच्या कालावधीत बदल केला असून पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे पूरबाधीत कुटूंबांना पुढील काही महिने चिंता करण्याची गरज नाही, असे  चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे