मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (07:49 IST)

राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता - शरद पवार

sharad panwar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच बंडखोर आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. दरम्यान, राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण हे सरकार आल्यानंतर ४८ तासांत तोच निर्णय घेण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्यपाल मिळाले, पण हे राज्यपाल, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यपालांवर टीका केली आहे. तसेच खरी शिवसेना कोणती “हे उद्या कोर्ट सांगेल. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.
 
यावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मुद्दावर पवार म्हणाले की, काही तरी कारण द्याव, म्हणून ते देत आहेत. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी कधी हिंदुत्वाचं तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं कारण दिलं. शिवसेना सोडण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण नसल्याचंही पवार यांनी नमूद केलं.