1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (07:36 IST)

अवकाळीचा इशारा, विदर्भात उष्णतेची लाट

heat wave in Vidarbha
राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पाऊस  होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच विदर्भात 9 ते 11 एप्रिल या दरम्यान उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला आहे. 
 
सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूरात  पावसाचा अंदाज आहे. तसंच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर सोबतच भंडारा, चंद्रपूर आणि नागपुरातही काही भागात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर 9, 10 आणि 11 तारखेला बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.