शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:36 IST)

अनेक ठिकाणी जोरदार पाऊस , पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बंटिंग सुरु केली आहे. पावसामुळे अनेक ठिकाण पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे.  भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
हवामान खात्याने मुंबईत सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आणि उपनगरातील भागात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. दरम्यान या पावसाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झाला नाही. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
भंडारा जिल्ह्यात पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील महत्वाची आणि जीवनदायी मानली जाणारी नदी वैनगंगा सुद्धा दुथडी भरून वाहते आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३ मीटरने वाढली आहे. यामुळे भंडारा शहराला पुराचा धिक अधीकच वाढला आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील टप्पा मोहल्ला, गणेश नगरी, ग्रामसेवक कॉलनी कपिल नगर या भागात पुराचे पाणी शिरत असल्याने तेथील नागरिकांना खबरदारीचा इशारा म्हणून जिल्हाप्रशासनाने विस्थापित केले आहे.
 
 गडचिरोलीत झालेल्या  मुसळधार पावसाने तिथले नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे तेथील २० मार्गांवरील वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. पुराच्या फटक्यामुळे २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. तर विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.