शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (12:54 IST)

परवानगी शिवाय रस्त्यांवर मंडप काढा हायकोर्टाचे पालिकेला आदेश

परवानगी शिवाय रस्त्यांवर मंडप लवकर काढा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे अनेक मंडळांवर संकट येणार आहे. परवानगी शिवाय रस्त्यांवर मंडप उभारले जातात कसे असा प्रश्न न्यायलयाने विचारला आहे. तर यावर कारवाई करा असे सांगत  उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.  न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ इक्‍बाल छागला यांच्या खंडपीठाने उल्हासनगर पालिका हद्दीत परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या मंडपांवर तातडीने कारवाई करून अहवाल सादर करा, असा आदेशच उल्हासनगर पालिकेला दिला आहे. मात्र हा आदेशलागू होताच आता इतर ठिकाणी सुद्धा कारवाई सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक मंडळे आता धोक्यात आली आहेत.  बेकायदा उभारणी विरोधात  हिराली फाऊंडेशनच्या सरिता बानचंदा यांच्यावतीने ऍड.सना बागवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.