सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 जून 2023 (17:27 IST)

Hingoli : भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकांचा मृत्यू

हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव फाटा या ठिकाणी ही घटना घडली असून पोलीस निरीक्षक नीलकंठ दंडगे यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात त्यांचे दोन सहकारी मित्र गंभीर जखमी झाले आहे. 

पोलीस निरीक्षक दंडगे हे जाम गव्हाण गावाचे होते. हिंगोली जिल्ह्या पोलीस दलात पोलीस निरीक्षक होते. हे आपल्या दोन मित्रांसह आखाडा बाळापूरहुन हिंगोलीच्या दिशेने कारने जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला त्यात ते जागीच ठार झाले. 
 
अपघाताची माहिती मिळतातच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस उपनिरीक्षकांचा मृतदेह ताब्यात घेऊन इतर जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे.  
त्यांच्या गावात त्यांच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. 

Edited by - Priya Dixit