1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 8 मे 2023 (21:30 IST)

माझ्याकडे त्या आमदारांचे प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन : नरहरी झिरवाळ

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकाल  ११ किंवा १२ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा निकाल येण्या आधीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले आहे. माझ्याकडे त्या आमदारांचे प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन, असे नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे. 
 
जर तुमच्याकडे आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार? असा सवाल  झिरवळ यांना करण्यात आला. त्यावर येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.
 
विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असे होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असा दावाही त्यांनी केला. माझ्याकडे हे प्रकरण येईल की नाही हे कोण पक्कं सांगू शकते? कारण शेवटी कोर्ट कोर्ट आहे. हे प्रकरण महत्त्वाचे आहे हे सर्वच म्हणतात. तेव्हाही महत्वाचे  होते. आजही त्याचे महत्व आहेच, असेही झिरवाळ यांनी सांगितलं.
 
अजित पवार यांच्या विषयी बोलतांना ते म्हणाले की, भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु, दादा कधीही भाजपात जाणार नव्हते. आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ तर दादा जातील ना, असेही झिरवाळ म्हणाले. राजीनामा प्रकरणावर भाजपाबरोबर जाऊ पाहणाऱ्या आमदारांचीच समिती नियुक्त करण्यात आल्याच्या वृत्ताचाही त्यांनी समाचार घेतला. अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नसल्याने कुणी बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता, असे झिरवाळ म्हणाले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor