सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (15:44 IST)

जळगाव : भररस्त्यात तरुणीचा तरुणावर चाकूने हल्ला

crime
Jalgaon News :सोशल मीडियावर सध्या काहीही वायरल होत असाच एक जळगावातील तरुण तरुणीच्या भांडणाचा  व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुणावर तरुणी चाकूने वार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 
 
हा व्हिडीओ जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील महा मार्गावरील आहे.भरदिवसात एक तरुणी एका तरुणावर शिवीगाळ करत चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला यात तरुणाला छातीवर चाकू लागला आणि तो जखमी झाला. 
 
व्हिडीओ मध्ये एक तरुणी हातात चाकू घेऊन तरुणाशी रागाने बोलत असताना तिने तरुणाच्या छातीवर वार केले चाकूने वार केल्यामुळे तरुणाचा छातीतून रक्त येऊ लागले आणि शर्ट रक्ताने माखला आहे. तरुण आणि तरुणीचे वाद सुरु आहे. त्यातून तरुण शर्ट काढतो तर ती तरुणी पुन्हा चाकूने त्या तरुणावर वार करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तरुण तिच्या हातून चाकू हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे. 

त्यात एक महिला येऊन तरुणीला चाकू खाली टाकून द्यायला सांगत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून हे तरुण तरुणी कोण आहे हे कळू शकले नाही. पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit