सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:46 IST)

पगारवाढ देऊनही संप चालू राहणार असेल तर....- अनिल परब

एसटी कमचाऱ्यांच्या अंतरिम पगारवाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
या घोषणेनंतरही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही कायम आहे.
अशावेळी अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक 26 नोव्हेंबरला पार पडली.
या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षांचा करार यावर विचार होऊ शकतो, असं अनिल परब म्हणाले.
तसंच पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर पैसे न दिलेले काय वाईट आहे. असा विचारही सरकार करु शकतं, असंही परब म्हणाले.