गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (16:16 IST)

रोहित पवारांच्या हस्ते 74 मीटर उंच भगवा ध्वजाचे प्रतिष्ठापना

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर ७४ मीटर उंचीचा भगव्या रंगाचा स्वराज्यध्वजाचे प्रतिष्ठापना करण्यात आले आहे.
 
महाराष्ट्रानं आजवर शिवसेना, भाजप आणि मनसेकडून भगव्याचं राजकारण होताना पाहिल आहे. परंतु आता मात्र, पवार कुटुंबाचा भगवा देखील राजकारणामध्ये येत आहे. दसऱ्यानिमित्त आमदार रोहित पवार हे त्यांच्या मतदार संघातल्या शिवपट्टण किल्ल्यामध्ये सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येत आहे. 74 मिटर या ध्वजाच्या उभारणीसाठी राजकीय प्रतिनिधींसोबत धार्मिक अतिथी सुद्धा उपस्थित असणार आहे.
 
90 किलो वजन, 74 ठिकाणी पूजन, ध्वजाचा 12 हजार किमी प्रवास
74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात आले असून या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे. विशेष म्हणजे हा ध्वज देशातील 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार असून 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास करण्यात आला आहे.
 
दसऱ्याच्या मुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना
दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला(उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. निरंतर बदलते जग आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव या सर्वांमध्ये आपल्या परंपरा जपून त्यांना पुढे नेण्याची गरज आहे.