मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:31 IST)

दिंडीत घुसली जीप, अपघात 14 वारकरी जखमी

varkari
आषाढीवारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पिकअप गाडी घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघात 14 वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकरींना मिरज सिव्हिल आणि कवठेम्हणकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आषाढी एकादशीसाठी हे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी निघाले होते. त्यावेळी केरेवाडी फाट्याजवळ अचानक एक पिकअप व्हॅन दिंडीत घुसली. या अपघातात 12 वारकरी गंभीर जखमी झाले.
वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून मोठा अपघात झाला. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधील 13 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर मार्गावर हा अपघात झाला. जखमींना मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.