जितेंद्र आव्हाड यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत अजित पवारांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत अजित पवारांना टोला लगावला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. दिल्लीत त्यांना ५ हजारांची मनसबदारी दिली, तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे.”
“एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा, लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे,” असं म्हणत त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.
“सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय”
सोशल मीडियावर लिहिणाऱ्या तरुणांवर होणाऱ्या कारवाईवर जितेंद्र आव्हाड “सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना उचलून नेलं जात आहे. हे तरुण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून व्यक्त होतात. ते कुणाला आई-बहिणीवरून शिव्या देत नाहीत.”
Edited By - Ratnadeep Ranshoor