शिवसेनेच्या अजून एका नेत्याची पोलखोल करणार, किरिट सोमय्या यांचे टि्वट
आता अजून एका शिवसेनेच्या नेत्याची पोलखोल करणार असल्याचं टि्वट भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केल आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोमय्या सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री रवींद्र वायकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत.याचदरम्यान, टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे कनेक्शन शिवसेना नेते वनमंत्री संजय राठोड यांच्याबरोबर असल्याचे समोर आले. या प्रकऱणावरून आक्रमक पवित्रा घेत भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
पण आता सोमय्यांनी येत्या दोन दिवसात अजून एका शिवसेना नेत्याचा पर्दाफाश करण्याचे टि्वट केल्याने शिवसेना नेत्यांच्या पोटात भीतिचा गोळा आला आहे. त्यातच आजपासूनच अधिवेशनही सुरू झाले आहे. यामुळे सोमय्या कोणत्या नेत्याचे बिंग फोडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.