शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (16:10 IST)

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसात सुरु

उडान  योजनेचे मार्ग जाहीर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 10 दिवसात सुरु होणार आहे. महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा सप्टेंबरमध्ये सुरु होणं प्रस्तावित आहे. मात्र आता ती दहा दिवसातच सुरु होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर-मुंबई मार्गावर पहिल्या टप्प्यात 9 सीटर विमान सेवा सुरु होईल. तसंच या मार्गावर दिवसातून दोन फेऱ्या होतील.