शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (09:20 IST)

आठ तास नंतर बिबट्या जेरबंद, वन परिमंडळ अधिकारी जखमी

सकाळी गंगापूर रोड परिसरात दर्शन दिल्यावर वन विभागाने अखेर बिबट्याला जेरबंद केले आहे. वन विभागाला तब्बल पाच तास बिबट्याला जर बंद करायला लागले असून, एकूण आठ तास बिबट्या गंगापूर रोड परिसरात होता. या बिबट्याला आर्किटेक्ट कॉलनी भागातून पकडले आहे. यावेळी पुन्हा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वन विभागाला अडचणी आल्या होत्या. या बिबट्याला पकडताना वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार बिबट्याचा हल्ल्यात जखमी झाले आहेत. अथक परिश्रम घेतल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात यश आले.
 
नाशिकच्या सावरकर नगरच्या परिसरात बिबट्‍याचा थरार सुरू होता. सकाळी काही नागरिकांना बिबट्‍या दिसला. ही माहिती परिसरात कळताचं बिबट्‍याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्‍याला पकडण्यासाठी प्रयत्‍न सुरू केले असता, यावेळी एका कर्मचार्‍यावर हल्‍ला चढवल्‍याने तो यात जखमी झाला आहे. तब्‍बल पाच  तासांच्या अथक पयत्‍नानंतर अखेर बिबट्‍याला पकडण्यात यश आले आहे.सावरकरनगर परिसरात बिबट्याचा पुन्हा थरार अनुभवायला मिळाला आहे. बिबट्याने जेव्हा पुन्हा दर्शन दिले आणि तो सी सी ती व्ही मध्ये कैद झाला, तव्हा  वन विभागाचे रेस्क्यू पथक परिसरात दाखल झाले होते.
 
मात्र सावरकर नगरमध्ये बिबट्या कुठे लपून बसला हे शोधणे कठीण झाले होते. नागरिकांची गर्दी थोडी  कमी झाली आणि बिबट्या आर्किटेक्ट कॉलनी मधील एका बंगल्यातून अचानकपणे बाहेर आला. त्यामुळे पुन्हा परिसरात घबराट पसरली. वनविभागाचे पथक याच भागात असल्यामुळे तत्काळ त्याचा माग काढणे बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नात वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार बिबट्याचा हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे. मात्र अखेर वन विभागाला यश आले आणि त्यांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात यश आले आहे.याच भागात २५ जानेवारीला बिबट्‍या आला होता. त्‍यावेळी या परिसरात बिबट्‍याला पकडताना चार लोक जखमी झाले होते. आज रविवारी पुंन्हा याच भागात बिबट्‍या आल्‍याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.