शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लोणावळा: दोघांच्या खुनाचे अजनुही रहस्य उलगडले नाही

लोणावळा येथे एक मित्र त्याची मैत्रीण यांची हत्या झाली होती. ते दोघेही प्रेमी युगल नव्हते तरीही त्यांची हत्या झाली आहे. एक महिना उलटून गेला तरी पोलिस प्रशासन कोणताच सुगावा काढू शकली नाही त्यामुळे घरा बाहेर शिक्षण घेत असलेल्या मुला मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे,
 
लोणावळ्यातील हत्याकांडाला एक महिना पूर्ण झाला आहे. यामध्ये एप्रिल 3 रोजी सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे या विद्यार्थ्यांचे मृतदेह भुशी धरणाच्या डोंगरात आढळले होते. तर हे हत्या सत्र झाले असेल तेव्हा या निरागस मुलांचे दोन्ही हात बांधून त्यांचा खून झाला होता. हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्यानं या घटनेचं गूढ आणखी वाढलं आहे. सिंहगड कॉलेजात सार्थक मेकॅनिकल इंजिनीअरिंग तर श्रुती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती.  सार्थक अहमदनगच्या राहुरीचा तर श्रुती पुण्यातील ओतूरची आहे. पोलिसांनी काहीतरी काम दाखवावे अशी ओरड होत आहे.