गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मे 2018 (09:08 IST)

१० वी आणि १२वी च्या निकालाची तारीख अजून निश्चित नाही

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या, दहावी आणि बारावीच्या निकालाच्या खोट्या तारखा व्हॉटस अॅपवर फिरत आहेत. मात्र या तारखांवर विश्वास ठेवू नका, कारण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र यंदा निकाल वेळेवरच लागणार आहे, असं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी  सांगितल आहे. 
 
यंदा दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर लागणार आहे, याची कोणतीही तारीख अजून निश्चित नाही. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र अजूनही कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र जर मे महिन्यात निकाल जाहीर करणे शक्य झालं नाही, तर १० जूनपर्यंत बारावी तसेच दहावीचा निकाल नक्कीच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, असं अध्यक्षांनी म्हटलं आहे.