रविवार, 13 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 12 एप्रिल 2025 (21:45 IST)

जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: २महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आता रेल्वे स्थानके विकसित करण्याचे काम सुरू आहे. जळगावमध्ये केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत 147 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रकमेमुळे आता जळगावमधील रेल्वे स्थानकांची स्थिती सुधारेल. केंद्र सरकारच्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत, जळगाव जिल्ह्यातील 5 प्रमुख रेल्वे स्थानकांचा आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी समावेश करण्यात आला आहे "राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका अॅल्युमिनियम युनिटमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात आठ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी अॅल्युमिनियम इंडस्ट्रीजमध्ये संध्याकाळी ७ वाजता स्फोट झाला, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. सविस्तर वाचा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात रायगड किल्ल्याला भेट देणार आहे. येथे ते मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करतील. सविस्तर वाचा
थोरियम अणुभट्टीच्या विकासासाठी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि रशियन सरकारी मालकीची कंपनी रोसाटॉम आणि थोरियम इंधनासह स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर यांच्यात हा करार झाला. सविस्तर वाचा

'फुले' चित्रपटातील काही दृश्ये काढून टाकण्याच्या सीबीएफसीच्या आदेशावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला. त्यांनी आरोप केला की या संघटना दलित-बहुजन इतिहास पुसून टाकू इच्छितात जेणेकरून जातीय भेदभावाचे सत्य समोर येऊ नये. सविस्तर वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या संबंधित विभागांसाठी १०० दिवसांचा अजेंडा निश्चित केला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागानेही यासाठी पुढाकार घेतला आहे. १०० दिवसांच्या अजेंड्यात 'सुपारी'चाही समावेश करण्यात आला आहे. या अजेंडाखाली, शुक्रवारी, एफडीए विभागाने नागपूरमधील कळमना येथील एका कारखान्यावर छापा टाकला आणि सुमारे ३० लाख रुपयांची सुपारी जप्त केली. सविस्तर वाचा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी पुण्यात पोहोचले. आज सकाळी 10:30 वाजता ते रायगड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. नंतर सकाळी ११ वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील. सविस्तर वाचा
मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला शिक्षा करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी शिवसेना यूबीटी नेते आदित्य ठाकरे यांचे विधान समोर आले आहे. सविस्तर वाचा
गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. राऊत म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आशीर्वाद देणार नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राणा मुद्द्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने म्यानमारमधील सायबर फसवणुकीतून ६० भारतीय नागरिकांना वाचवले. या प्रकरणात एका परदेशी नागरिकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयाने डेंग्यूच्या रुग्णाला ६ लाख रुपयांचे बिल दिल्याने गोंधळ उडाला आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी रुग्णालय प्रशासनावर टीका केली. डॉक्टरांशी फोनवर बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि विचारले, "तुम्ही रुग्णाला अमृत दिले का की बिल ६ लाख रुपये आले?" सविस्तर वाचा
मुंबईतील एका आयटी व्यावसायिकाची १.९६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल आणि त्याला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. सविस्तर वाचा
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबई पोलिसांना या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सविस्तर वाचा
उमरेड येथील एमआयडीसी परिसरातील एमएमपी कंपनी या अॅल्युमिनियम पावडर उत्पादन कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी 6:15 वाजता स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. या घटनेत 8 कामगार गंभीर जखमी झाले, त्यापैकी 2 गंभीर जखमी कामगारांना उमरेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित 6 जखमींना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. 25 हून अधिक कामगार बराच वेळ आत अडकले होते.सविस्तर वाचा...

ठाणे जिल्ह्यात एका संस्थेद्वारे चालवणाऱ्या अनधिकृत वसतिगृहात होणाऱ्या गैरवर्तनच्या तक्रारी नंतर 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.सविस्तर वाचा...
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहांसमोर एक मोठी मागणी केली. ही मागणी यापूर्वी भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केली होती.सविस्तर वाचा... 
 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या345 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यमंत्री शिवेंद्रसिंह भोसले होते. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह भोसले हे मराठा योद्धे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.सविस्तर वाचा...

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आता रेल्वे स्थानके विकसित करण्याचे काम सुरू आहे. जळगावमध्ये केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत 147 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रकमेमुळे आता जळगावमधील रेल्वे स्थानकांची स्थिती सुधारेल. केंद्र सरकारच्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत, जळगाव जिल्ह्यातील 5 प्रमुख रेल्वे स्थानकांचा आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी समावेश करण्यात आला आहे.सविस्तर वाचा... 
 

पुण्यातील मोशी येथे खिरीड वस्ती परिसरात भारतमाता चौकाजवळ शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी एका झाडाला दोन पुरुषांचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसरी पोलीस प्रकरणाचा तपास करत असून अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. सविस्तर वाचा... 

नवी मुंबईत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.हे रॅकेट एका लॉज मध्ये सुरु होते. सदर माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिली.सविस्तर वाचा...

एका झाडाने एक शेतकऱ्याला रातोरात करोडपती केल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. जवळपास 100 वर्ष जुने असलेले झाड ने त्याला करोडपती बनवले आहे. सविस्तर वाचा... 
 

मायग्रेनला कंटाळून एका 20 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली कुणाल पोपट जाधव असे मृताचे नाव आहे, जो गेल्या काही काळापासून तीव्र मायग्रेनचा झटका आणि नैराश्याने ग्रस्त होता. कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोटे म्हणाले, “कुणाल हा नेरुळ येथील  अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता आणि तो कळंबोली येथील हमसध्वनी गृहनिर्माण सोसायटीमध्ये त्याच्या कुटुंबासह राहत होता.सविस्तर वाचा...