बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्र केसरी पैलवान झाला पोलीस उपअधीक्षक

महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केलं आहे. तीन वेळा या राज्यात झालेला महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी हे डीवायएसपी अर्थात पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. उशिरा का होईना मुख्यमंत्री यांनी आपला शब्द पाळला आहे. तर विजय चौधरी यामुळे  आनंदित झाला आहे. पोलिस खात्यातील राज्यातील मोठे पद त्याला मिळाले आहे,
 
एकदा नाही तर सलग तीनदा  महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना  शासकीय सेवेत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2016 मध्ये  जाहीर केलं होतं. हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत विजय चौधरींचं अभिनंदन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली होती. तर आता एक वर्षांनी विजय यांची नेमणूक फडणवीस सरकारने केली आहे त्यामुळे राज्यातील अनेक खेळाडू प्रफुल्लीत झाली आहेत.सोशल मिडियावर फडणवीस सरकारचे अभिनंदन नागरीक करत आहेत.