बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा महत्वपूर्ण निर्णय

आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्याच्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वारी काळामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर दारूदुकाने मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री बंद ठेवण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
 
येत्या २५ जून २०१९ रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे, तर २४ जून २०१९ रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुण्यात अनेक वारकरी येत असतात. मात्र यंदाच्या वारी कालावधीमध्ये पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि मार्गावर दारू, मांस आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पालखी सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.