गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (18:00 IST)

मनसे कार्यकर्त्यांनी केली अ‍ॅमेझॉनचे ऑफिसची तोडफोड

पुण्यात कोंढवा भागात मनसे कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनचे ऑफिसची  तोडफोड केली. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते मात्र.राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर अ‍ॅमेझॉनला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा चित्रे यांनी दिला होता.