शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जून 2022 (17:28 IST)

यंदा महाराष्ट्रात पाऊस अधिक!

monsoon
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नेऋत्य मोसमी पावसाचे केरळ मध्ये आगमन झाले आहे. यंदा जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या तुलनेत 101टक्के म्हणजे सर्वसामान्य पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्या आणि विदर्भातील काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी चार महिन्यात सरासरी पेक्षा अधिक कोसळणार आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागात आणि पूर्व विदर्भात पावसाच्या सरी सर्वसाधारणपणे बरसणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भाच्या तीन ते चार जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता आहे. 

या वर्षी पावसाचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचे वर्तवले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसण्याचे सांगण्यात आले आहे.  यंदा पाऊसकाळ चांगला राहण्याचे हवामान तज्ञानी सांगितले आहे. राज्यातील 4 जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. राज्याचे यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, अकोला या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे.