गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (09:15 IST)

अवकाळी पावसाचा फटका बसणार आर्थिक राजधानी मुंबईला

राज्यभर पडत असलेल्या अवकाळी म्हणावे अश्या पावसाचा फटका आता मुंबईकरांना बसणार आहे. या पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर मतोह परिणाम झाला असून, पालेभाज्यांच्या आवक घटल्याने त्याचे बाजारभाव वाढत आहेत.  पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याची झळ आता मुंबईकरांना बसणार आहे. यात कोथिंबीरची जुडी 25 ते 30 रुपयांवर पोहोचली असून, मुंबई, नवी मुंबई परिसरासाठी रोज 6 ते 7 लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची गरज असते. मात्र सद्य स्थितीमध्ये सरासरी साडेचार ते पाच लाख जुडयांचीच आवक होऊ लागली आहे.याचा सरळ सरळ परिणाम हा बाजारभावावर झाला आहे.
 
होलसेल मार्केटमध्ये आठवडयापूर्वी कोथिंबीरची जुडी 20 ते 30 रुपयांना विकली जात होती. त्यामध्ये वाढ होऊन 25 ते 55 रुपयांवर गेली आहे. शेपू, मेथी आणि अन्य पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. महागाई दर कमी होऊनही पुन्हा एकदा मुंबई ठरले देशातील, तर हाँगकाँग जगातील सर्वात महागडे शहर नाशिक, पुणे, सातारा परिसरातून मुंबईला भाजीपाला विक्रीसाठी येतो, राज्यभर पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे.
 
सध्याचे पालेभाज्यांचे भाव:
1. कोथिंबीर- 25 ते 55 रुपये जुडी
 
2. मेथी- 20 ते 40 रुपये
 
3. पालक- 10 ते 25 रुपये