1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 एप्रिल 2017 (13:11 IST)

तीन महानगरपालिकेसाठी मतदान सुरु

लातूर, परभणी, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यात 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली.उन्हामुळे मतदान 5.30 ऐवजी 6.30 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच येथे सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.