शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (08:42 IST)

महापालिकेचे सफाई सेवकांचे पथक कोल्हापूरला रवाना

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्यस्थितीत पूर ओसरत असून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम करण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असणारे मनुष्यबळ अपुरे असून त्यासाठी पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी पुणे महानगरपालिकेकडील 50 स्वच्छता सेवकांची मागणी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती.
 
महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीचा सामाना करावा लागला असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराची निर्माण होऊन त्यामध्ये 411 गावे बाधीत झालेली आहेत. विशेषत: शिरोळ, करवीर व हातकणंगले या तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अस्वच्छता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
 
कोल्हापूरमधील सध्याच्या बिकट परिस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयांकडे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कार्यरत सफाई सेवक व मुख्य विभागाकडील काही पर्यवेक्षकीय स्टाफ यांना कोल्हापूर येथे पाठविल्यामुळे स्वच्छतेच्या कामात मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही मदत होणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील 61 पर्यवेक्षीय स्टाफ व सफाई सेवकांस सार्वजनिक स्वच्छतेच्या कामासाठी मदतनीस म्हणून कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.
 
पुणे महानगरपालिकेकडील कर्मचारी व सेवक दि. 31 जुलै 2021 पासून दि. 7 जुलै 2021 या कालावधीत कोल्हापूर येथे जाणे, आवश्यक स्वच्छतेचे कामकाज करणे व काम पूर्ण झाल्यावर परत येणे यासाठी 2 मोठ्या बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ यांचेमार्फत चालक व मेकॅनिकसह आणि मोटार वाहन विभागामार्फत 1 युटीलिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली. या सर्व सेवकांना कामकाजाकरिता आवश्यक साहित्य व सुरक्षा प्रावरणे देण्यात आलेली आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथून या टीमला फ्लॅग ऑफ देण्यात आला.