रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 मार्च 2019 (13:41 IST)

धनंजय मुंडे यांच्या समर्थकाची बीड मध्ये हत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे जवळचे समर्थक पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाली आहे. या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये परत एक हत्या झाल्याचे समोर आले आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. बीड जिल्ह्यात 24 तासात दोन हत्यांनी हादरला आहे.
 
अजय भोसले या तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला, पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येशी अजय भोसले हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे दोन्ही हत्यांचे गूढ वाढत आहे. परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांची ओव्हर ब्रिजच्या खाली धारदार शस्त्राने हत्या केली गेली आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येचं कारण अजून तरी समोर आले नाही. गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे या घटनेला आणखी महत्त्वं आलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकारणाशी संबंधित व्यक्तीची हत्या झाली असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.